26 February 2020

News Flash

Video : …म्हणून तैमुरचा लंडनमधील ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

सेटवरचे सारे जण त्याचा हा बालहट्ट पाहून आनंद व्यक्त करत आहेत

तैमुर अली खान

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर अली खान केवळ दोन वर्षांचा आहे. मात्र त्याची लोकप्रियता एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. एवढ्या लहान वयामध्ये त्याचे असंख्य चाहते आहेत. दिवसेंदिवस त्याचा चाहतावर्ग वाढत असून त्याची लोकप्रियता परदेशातही असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या तैमुर त्याच्या आई-वडीलांसोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून त्याचा येथील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सैफ अली खान लवकरच ‘जवानी जानेमन’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे सैफ सध्या या चित्रपटाचं चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून तैमुरदेखील आपल्या वडीलांसोबत येथे गेला आहे. या सेटवरचा तैमुरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तैमुर वडील सैफ अली खानसोबत मस्ती करताना दिसत आहे. यावेळी त्याने निळ्या रंगाची डेनिम जीन्स, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पायात बूट घातले आहेत.

 

View this post on Instagram

 

Taimur is in playing mood on the set of his father

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab) on

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तैमुर सैफकडे उचलून घेण्याचा हट्ट करत आहे. त्यामुळे सेटवरचे सारे जण त्याचा हा बालहट्ट पाहून आनंद व्यक्त करत आहेत. ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट विनोदीपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून पूजा बेदी यांची मुलगी आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

First Published on June 23, 2019 3:31 pm

Web Title: taimur fun on the london street ssj 93
Next Stories
1 लग्नसोहळ्यात कतरिनाचा जलवा, व्हिडीओ व्हायरल
2 बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’चं राज्य, दुसऱ्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला
3 Video: दीपिकाला आयडीसाठी सुरक्षा रक्षकाने अडवले आणि…
Just Now!
X