30 September 2020

News Flash

‘तू सुंदर दिसतो’ म्हटल्यावर तैमुर झाला नाराज; मुलाखत घेणाऱ्या अँकरला म्हणाला…

सैफची मुलाखत सुरु असताना दुसऱ्यांदा तैमुरची लूडबूड

अभिनेत्री करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांचा लाडका मुलगा तैमुर कायमच चर्चेत असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र यावेळी तैमुर सैफ अली खानच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. सैफ लाईव्ह मुलाखत देत असताना अचानक तैमुर स्क्रीन समोर येऊन उभा राहिला अन् त्याने मुलाखत घेणाऱ्या अनुपमा चोप्रा यांना थक्क करणारं उत्तर दिलं.

चित्रपट समिक्षक अनुपमा चोप्रा इन्स्टाग्रामवरुन सैफ अली खानची मुलाखत घेत होत्या. तेवढ्यात तैमुर आपल्या बाबांच्या शेजारी येऊन उभा राहिला. तैमुरचा गोंडस चेहरा पाहून अनुपमा यांनी त्याचे कौतुक केले. त्या म्हणाला, “तू किती सुंदर (gorgeous) दिसतोस.” यावर क्षणाचाही विलंब न करता “मी सुंदर दिसत नाही.” असं उत्तर तैमुरने दिलं. हे प्रतिक्रिया ऐकून सैफ अली खान देखील थक्क झाला.

तैमुरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जाणांनी तैमुरच्या या उत्तराचं कौतुक देखील केलं आहे. सैफ लवकरच ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अभिनेत्री तब्बू त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 3:14 pm

Web Title: taimur hilarious response to being called gorgeous mppg 94
Next Stories
1 करण जोहरकडे चाहत्यांनी फिरवली पाठ; २० मिनिटांत इतके लाख फॉलोअर्स झाले कमी
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमान, एकता आणि करण विरोधात तक्रार
3 होय मी नरेंद्र मोदींचा चाहता आहे – सोनू सूद
Just Now!
X