पाकिस्तानात भीषण विमान अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळले. या दूर्दैवी घटनेवर बॉलिवूड चित्रपट निर्माता तनूज गार्ग याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

“दुखद बातमी, पाकिस्तानात विमानाचा अपघात झाला. या दुदैवी घटनेबाबत मी शोक व्यक्त करत आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन तनूज गार्ग याने दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते. करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होती असे पाकिस्तानातील एका पत्रकाराने आजतक वाहिनीवर बोलताना सांगितले. मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. नेमकी जिवीतहानी किती झाली ते पाकिस्तानी यंत्रणेने अजून स्पष्ट केलेले नाही. पण अपघातस्थळी गोंधळ आणि भितीचे वातावरण आहे.