करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन घोषित केलं आहे. या काळात जिवनावश्यक वस्तू वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अनेक उद्योग-धंद्यांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. अनेक सिनेमांसह टिव्ही मालिकांचं चित्रीकरणही या काळात थांबलेलं आहे. सब टिव्हीवर प्रसारित होणाऱ्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील अय्यर हे पात्र साकारणारा तनुज महाशब्देही या काळात घरात राहून सर्व काम करतोय.

क्वारंटाइनच्या काळात सध्या घराची साफसफाई करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व जबाबदारी ही तनुजकडेच आहे. घरातली कामं करतानाचा एक खास व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे.

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

मुळचा इंदूरचा असलेला तनुज गेली अनेक वर्ष टिव्ही इंडस्ट्रीत काम करतो आहे. याआधी त्याने सीआयडी या प्रसिद्ध मालिकेतही काम केलं आहे. तारक मेहता या मालिकेत शास्त्रज्ञाची भूमिका करणाऱ्या तनुजने मरीन कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतलेली आहे. याव्यतिरीक्त काही चित्रपटातही तनुजने कामं केली आहेत.