प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये नाना अभिनय करताना दिसतील अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या या पुनरागमनावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने संताप व्यक्त केला आहे. नानांसारख्या व्यक्तीला निर्माते काम कसं देऊ शकतात? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत लैंगिक गैरवर्तणुक केली होती, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने त्या प्रकरणाचा उल्लेख पुन्हा एका नाना पाटेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती म्हणाली, “नाना पाटेकर यांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांच्यामुळे माझं फिल्मी करिअर संपलं. काही वर्ष मी नैराश्येत देखील होते. स्त्रियांचा अनादर करणाऱ्या या व्यक्तीला बॉलिवूडमध्ये पुन्हा काम देऊ नये. निर्मात्यांनी नाना पाटेकर यांना पाठिंबा देऊ नये. या देशातील लोक सुशांतला न्याय मिळावा यासाठी प्रशासन व्यवस्थेशी लढले. परंतु मला मात्र कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. असे आरोप करत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर टीका केली.”