News Flash

‘हे माँ माताजी!’, नव्या दयाबेनचा शोध थांबला? हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा

दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे.

TMKOC, Daya Bhabhi, TAARAK MEHTA KA OOLTAH CHASHMAH, Dayaben, social media, Disha Vakani,
४ वर्षे उलटली तरी देखील दयाबेन मालिकेत परतली नाही

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दयाबेनच्या भूमिकेत अभिनेत्री गरिमा दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी निर्मात्यांना नवी दयाबेन मिळाली असे म्हटले आहे.

गरिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती दयाबेनच्या लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तू तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहेस का? असे विचारले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मालिकेचे निर्माते आसित मोदी यांना टॅग करत गरिमाचा लूक पाहा असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’मधील हे कलाकार अजूनही आहेत अविवाहीत

 

View this post on Instagram

 

A post shared by Garima Goel (@garimasgoodlife)

गेल्या काही दिवसांपासून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळते. चाहते तिच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या सोशल मीडियावर गरिमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून लवकरच गरिमा दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडीओमध्ये गरिमा दयाबेनच्या भूमिकेत दिसत आहे. ती ‘जेठालाल’ ऐवजी ‘पेठालाल’ला बोलवताना दिसत आहे. तसेच ‘बबीता जी’च्या ऐवजी ती ‘कविता जी’ देखील बोलताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 4:07 pm

Web Title: tarak mehta ka oolta chashma dayaben search stop avb 95
Next Stories
1 मलायका नाही तर ‘या’ व्यक्तीच्या नावाचा टॅट्यू काढला अर्जुनने
2 प्रिया बापटने पूर्ण केली ‘आणि काय हवं?’च्या सीजन ३ ची शूटिंग पूर्ण
3 ‘या’ गोष्टीत अजय देवगण ठरला नंबर वन; सलमान खान आणि साउथ स्टार विजयलाही टाकलं मागे!
Just Now!
X