‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलान हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कठीणातील कठीण विषय अगदी सोप्या पद्धतीने चित्रपट माध्यमातून हाताळण्याच्या विशेष शैलीमुळे अगदी कमी कालावधीत त्याने अफाट यश मिळवले. आता हा महत्वकांक्षी दिग्दर्शक आपला आगामी चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

दबंग सलमानचा गौरव करण्यासाठी WWE नं मोडला स्वतःचाच नियम

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

मल्लिकाच्या ‘त्या’ मादक कृतीमुळे सलमानही लाजला

या चित्रपटाचे नाव ‘टेनेट’ असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री डिंपल कपाडिया झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने डिंपल कपाडिया पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करणार आहे.
‘टेनेट’ हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी जगातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने स्विकारली आहे. ‘टेनेट’ या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो. चित्रपटाच्या नावावरूनच नोलान पुन्हा एकदा ‘डार्क नाईट ट्रायोलॉजी’ किंवा ‘डंकर्क’ पठडीतला चित्रपट तयार करत असल्याची चर्चा होती. परंतु यावेळी नोलान आपल्या पारंपारिक शैलीपेक्षा एक वेगळाच प्रयोग करत असल्याची माहिती निर्माते वॉर्नर ब्रदर्स यांनी दिली आहे. यामुळे चाहते या अगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

अक्षयने पत्नीला दिलं आजवरचं सर्वात महागडं गिफ्ट, पाहा फोटो

‘टेनेट’ या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या भूमिकेविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती वॉर्नर ब्रदर्स यांनी दिलेली नाही. मात्र ट्रेलमध्ये डिंपल कपाडिया यांची एक झलक दिसत आहे. ख्रिस्तोफर नोलानची पार्श्वभूमी पाहता डिंपल एका सशक्त भूमिकेत दिसणार यात शंका नाही.