यशाच्या शिखरावर असताना अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आयुष्य संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? याचीच चर्चा सध्या सुरू आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहे. असं असतानाच आता सुशांत मानसिक तणावामध्ये होता त्यामधून त्याचे अगदी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अशाच आता सुशांतच्या ट्विटवर अकाउंटवरील कव्हर फोटोही चर्चेत आला आहे. या कव्हर फोटोवरुन सुशांत हा मानसिक तणावाखाली असल्याचे संकेत त्याने दिले होते असं बोललं जातं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर या कव्हर फोटोसंदर्भात सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यासंदर्भात अनेक ट्विटसही करण्यात आले आहेत.

काय आहे हा फोटो?

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

सुशांतने ट्विटवरवर कव्हर फोटो म्हणून ठेवलेलं हे चित्र पश्चिमात्य कलेवर तगडा प्रभाव असणारे पॉलिश चित्रकार व्हिनसेन्ट व्हॅन गोव्ह यांनी काढलं आहे. त्यांनी त्यांच्या आय़ुष्यामध्ये दोन हजारहून अधिक चित्र काढली होती. मात्र सर्वाधिक चित्र त्यांनी मृत्यूपूर्वीच्या एका वर्षाच्या कालावधीत काढली होती. गोव्ह यांनीच काढलेले ‘स्टेअरी नाइट्स’ नावाचे चित्र सुशांतने ट्विटवर कव्हर फोटो म्हणून ठेवलं होतं. २९ जुलै १८९० रोजी गोव्ह यांनी बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. ते दक्षिण फ्रान्समधील एका उपचार केंद्रावर मानसिक तणावाशी संबंधित आजारामुळे उपचार घेताना त्यांनी १८८९ साली जी चित्र काढली होती त्यामध्ये ‘स्टेअरी नाइट्स’चाही समावेश होता. गोव्ह यांच्या वागण्यामध्ये बदल झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. भ्रम आणि आत्महत्येसंदर्भातील विचार करत असल्याने त्यांना असायलम म्हणजेच बंदीगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं.

नक्की वाचा >>“सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर…”; महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

सुशांत ट्विटरवर फारसा सक्रीय नव्हता. त्याने २७ डिसेंबर रोजी शेवटचं ट्विट केलं आहे. त्यामुळेच तो मागील काही महिन्यांपासून मानसिक ताणवाच्या त्रासाला तोंड देत असल्याचे बोललं जातं आहे. सुशांत हा कला विश्वातील अनेक गोष्टींबद्दलचा जाणकार होता. त्याचा वाचनाची आणि कलेची आवड होती. त्यामुळेच त्याने काहीतरी विशिष्ट हेतूने हा कव्हर फोटो ठेवला असणार अशी सध्या चर्चा आहे.

गोव्ह यांच्या चित्रांशी संबंधित वेबसाईटवर स्टेअरी नाइट्स या चित्राचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे. “या चित्राची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चित्र पूर्णपणे व्हॅन गोव्ह यांच्या कल्पनाशक्तीमधून रेखाटलेलं आहे. त्यांच्या खिडकीतून किंवा त्यांना ठेवण्यात आलेल्या सेंट पॉल येथील कोणत्याही नैसर्गिक दृष्याशी हे चित्र साधर्म्य साधणारं नाहीय. त्यांना जे दिसतं ते साकारण्याची सवय असणाऱ्या व्हॅन गोव्ह यांच्या ठराविक चित्रांपेक्षा हे चित्र अनेक अर्थांनी वेगळं आहे,” असं या चित्राचं वर्णन वेबसाईटवर करण्यात आलं आहे. याच चित्राचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

नक्की वाचा >> “आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, केंद्रीय संस्थांकडून सुशांतच्या आत्महत्येचा तपास करा”

एनसीबीआय म्हणजेच अमेरिकेतील मेडिसीन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार व्हॅन गोव्ह यांना मॅनिक डिप्रेशनचा त्रास होता. सामान्यपणे कला क्षेत्रातील व्यक्तींना या मानसिक आजाराचा अधिक त्रास होतो असं सांगितलं जातं.