News Flash

VIDEO : जुळ्या, तिळ्या नव्हे तर सहा मुलांना अक्षयने दिला जन्म!

अपना हिरो पेटसे

akshay kumar
अक्षय कुमार

मुलाला जन्म देणे हा प्रत्येक स्त्रीसाठी पुनर्जन्म असतो. परंतु, स्त्री ऐवजी जर पुरुषांनी बाळाला जन्म दिला तर…. विचार करा. कल्पनाही करवत नाही ना…. पण, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्याबाबतीत हे घडलेय. त्याने जुळ्या, तिळ्या नव्हे तर तब्बल सहा मुलांना जन्म दिला असून, ही मुले सामान्य नाहीत. सहसा बाळ जन्माला आल्यावर रडते, पण ही मुले रडण्याऐवजी हसत हसतच जन्माला आली. हे सगळं वाचल्यानंतर साहजिकच तुमच्या मनात याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असले. मात्र, त्यासाठी तुम्हाला अक्षय कुमारच्या आगामी टेलिव्हिजन शो चा टीझर पाहावा लागेल.

‘खतरो के खिलाडी’ आणि ‘मास्टर शेफ ऑफ इंडिया’ या रिअॅलिटी शोंचे सूत्रसंचालन केल्यानंतर अक्षय कुमार आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५’ कॉमेडी शोद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’चा चौथा सिझन २००८ साली आला होता.

वाचा : इशा म्हणते, ‘ती मी नव्हेच’

काही दिवसांपूर्वीच अक्षयने कॉमेडियन झाकिर खानला ट्विटमध्ये नमूद करून लिहिलेलं की, ‘काहीतरी आंबट खाण्याची इच्छा होत आहे? काही सल्ला देऊ शकतोस का…. आधीच मी खूप खाल्लं आहे.’ या ट्विटनंतर लगेच त्याने आणखी एक ट्विट केले. ‘मल्लिका दुआ, मी पुस्तकं तर बरीच वाचली आहेत. पण तरीही मी अस्वस्थ झालोय. आता मी काय करू?,’ असा सवाल त्याने वेब सेन्सेशन मल्लिका दुआला केला. अक्षयने शुक्रवारी केलेले ट्विट तर अनेकांना बुचकळ्यात टाकणारे होते. त्याने लिहिलेलं की, ‘आता तर पोटात लाथा मारण्यासही सुरुवात झालीये….. आता राहावत नाहीये…. असं का होतंय हे जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता लागली असेल.’ या ट्विटला त्याने #ComingSoon असा हॅशटॅग दिला होता.

वाचा : CINTAA कडून बाबा राम रहिमचा परवाना रद्द

अक्षयच्या ट्विटमुळे त्याचे चाहतेही गोंधळले होते. अखेर, अक्षयने शुक्रवारी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५’चा टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या ट्विट्सचा उद्देश चाहत्यांना कळला. कॉमेडीमध्ये तरबेज असलेल्या अक्षयचा टीझर तुम्हाला खळखळून हसण्यास भाग पाडेल. टीझरच्या सुरुवातीला अक्षय गरोदर दाखवण्यात आला असून, त्याला नंतर सहा मुले झाल्याचे पाहावयास मिळते. शेवटी तो स्वतःची ओळख ‘फादर ऑफ कॉमेडी’ अशी करून देतो. हा टीझर शेअर करताना अक्षयने एक मजेशीर ट्विट केलेले. ‘दुनिया सोच रही है ये अजूबा कैसे हुआ?’, असे लिहत त्याने ‘अपना हिरो पेटसे’ #ApnaHeroPetSe असा हॅशटॅग दिला.

अक्षयव्यतिरीक्त कॉमेडियन झाकिर खान ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५’चे परीक्षण करणार आहे. सुनील पाल, एहसान कुरेशी, भारती सिंग, राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा यांसारखे नामांकित कॉमेडियन्स ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 12:25 pm

Web Title: the great indian laughter challenge 5 teaser not twins or triplets akshay kumar delivers six babies
Next Stories
1 ‘बॉलिवूडची नवी आलिया भट’ ; ‘त्या’ ट्विटमुळे तापसी पन्नूची खिल्ली
2 इशा म्हणते, ‘ती मी नव्हेच’
3 CINTAA कडून बाबा राम रहिमचा परवाना रद्द
Just Now!
X