24 September 2020

News Flash

पाहाः ‘द जंगल बुक’चा ट्रेलर

मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब होऊन प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.

Jungle Book trailer : ‘द जंगल बुक’या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने मोगली आणि त्यांचे मित्र आता पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

मोगलीच्या ‘द जंगल बुक’ या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये ‘मोगली’, ‘बगिरा’, ‘शेरखान’ या प्रमुख पात्रांची झलक पाहायला मिळते. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयची उत्सुकता निश्चितच वाढली आहे. डिस्नेचा ‘द जंगल बुक’ हा सिनेमा १५ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘मोगली’ मालिकेतील ‘जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है’ हे गाणे/शीर्षक गीत लहान मुले आणि मोठय़ांमध्येही खूप लोकप्रिय झाले होते. जंगलामध्ये प्राण्यांबरोबर राहणारा हा ‘मोगली’ मुलांचा ‘हिरो’ झाला होता.
‘द जंगल बुक’या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने मोगली आणि त्यांचे मित्र आता पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ‘द जंगल बुक’मध्ये बाल कलाकार नील सेठी याने ‘मोगली’ची भूमिका साकारली असून प्रख्यात निर्माते व दिग्दर्शक बेन किंग्जले यांनी मोगलीचा जीवलग मित्र ‘बगिरा’या पात्राला आवाज दिला आहे. ‘बल्लु’ या अस्वलाच्या पात्राला बिल मरे यांनी तर इद्रिस अल्वा, स्कार्लेट जॉन्सन, क्रिस्तोफर वॉकेन यांनी अन्य पात्रांना आवाज दिला आहे.  मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट भारतात हिंदी भाषेत डब होऊन प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2016 1:23 am

Web Title: the jungle book trailer mowgli is back with his army of wild
टॅग Hollywood
Next Stories
1 अनुष्काने लगावली सलमानच्या कानशिलात!
2 REVEALED: शाहीन होती सलमान खानचे पहिले प्रेम!
3 पंतप्रधानांनी ओढला आरवचा कान; अक्षयने मानले आभार
Just Now!
X