30 November 2020

News Flash

‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका

जाणून घ्या, राजकुमार- प्रियांकाच्या आगामी चित्रपटाविषयी

‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे.  प्रियांका कायम चाहत्यांसोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करत असते. विदेशी सूनबाई झालेली प्रियांका लवकरच द व्हाइट टायगर या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियांकाची चर्चा सुरु झाली आहे.

‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामध्ये मी पिंकी नामक भूमिका साकारत आहे. तर अभिनेताआदर्श गौरव हा बलराम हलवाई या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका कुटुंबाची आणि एका मुलाच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मी अनेक नवोदित कलाकारांसोबत काम केलं, मात्र, आदर्श गौरव हा अत्यंत हुशार आणि गुणी अभिनेता आहे, असं प्रियांका म्हणाली.

दरम्यान,दिग्दर्शक रमिन बहरानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर मुकुल देवडा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे प्रियांका या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच एक्झिकेटिव्ह प्रोड्युसरची भूमिकादेखील पार पाडणार आहे. प्रियांका आणि राजकुमार रावसोबतच अभिनेता आदर्श गौरवदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:38 pm

Web Title: the white tiger will make you uncomfortable priyanka chopra rajkumar rao dcp98 ssj 93
Next Stories
1 ‘मेरे साई’ मालिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर
2 कातिलाना अदा! पलक तिवारीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
3 “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल
Just Now!
X