03 August 2020

News Flash

नाट्यक्षेत्रातील तरुण कलाकाराच्या आत्महत्येने पुण्यात खळबळ

स्वप्नीलने 'मंत्रा' या मराठी चित्रपटासह इतर मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.

पुणे : नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या स्वप्नील शिंदे या तरुण कलाकाराने आत्महत्या केली आहे.

पुण्यातील नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि सिनेमा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याची धडपड करीत असलेल्या स्वप्नील शिंदे नामक एका ३१ वर्षीय तरुण कलाकाराने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेत राहणाऱ्या स्वप्निलने ‘मंत्रा’ या मराठी चित्रपटासह इतर मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच तो पुण्याच्या नाट्यक्षेत्रातील एक सक्रिय कलाकार होता. तसेच त्याची ‘स्वप्न’ नावाची नाट्यसंस्था होती आणि सीडी विक्रीचाही व्यवसाय देखील तो करीत होता.

स्वप्निलचे सर्वकाही ठीक सुरु असताना शुक्रवारी स्वप्निलने राहत्या घरी बेडरुममध्ये रात्रीच्या सुमारास गळफास घेतला. बेडरुममधून तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मात्र, स्वप्निलने नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2019 7:10 pm

Web Title: the young theater artist swapnil shinde suicide in pune aau 85
Next Stories
1 मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का? : बच्चू कडू
2 मुंबईसह राज्यभर पावसाचे पुनरागमन
3 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई पुरंदरे कालवश
Just Now!
X