हॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून अभिनेत्री किम कार्दशियनकडे पाहिलं जातं. किम तिच्या अभिनयापेक्षा चित्रविचित्र पेहराव, वादग्रस्त वक्तव्य, लीक होणारे खासगी व्हिडीओ आणि मादक फोटोशूट यामुंळेच जास्त चर्चेत असते. यावेळी तिने असंच एक फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ चर्चेतच नाही तर ती सध्या ट्रोल होत आहे.
किमने अलिकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने स्नेक प्रिंट असलेले कपडे परिधान केले असून ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. विशेष म्हणजे तिचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा फोटो, फोटोशॉपच्या मदतीने एडीट केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे.
Venomousss pic.twitter.com/ybc8Q1u7yD
— Kim Kardashian West (@KimKardashian) May 4, 2020
किमने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो शेअर केले आहेत. यामध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये तिच्या केसांमध्ये अन्य एका व्यक्तीच्या हाताची बोट दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहिल्यानंतर तिने तो फोटोशॉपच्या मदतीने एडीट केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला ट्रोल करण्या सुरुवात केली.
You left an extra hand in your hair pic.twitter.com/EmXCNpPmQ1
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Ferris Wheel (@NicolaFerris) May 4, 2020
THE NAILS IN HER HAIR LMFAO PHOTOSHOP IS HER PASSION pic.twitter.com/ImI5ejXh0D
— Alex (@blankspacebabyd) May 4, 2020
दरम्यान, ट्रोल होण्याची किमची ही पहिलच वेळ नसून यापूर्वी देखील ती बऱ्याच वेळा ट्रोल झाली आहे. त्यामुळे अनेकदा ती ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करताना दिसून येते.