अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. अनुष्काचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. ती नेहमी वेगळ्या आणि चौकटीबाहेरील भूमिकांचं आव्हान स्वीकारताना दिसते. सध्या रिमेकचा ट्रेण्ड असल्याने शाहरुखच्या एका चित्रपटाच्या रिमेकमध्ये भूमिका साकारण्याची इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि मनीषा कोईरालाच्या ‘दिल से’ चित्रपटाचा रिमेक व्हावा अशी इच्छा अनुष्काने व्यक्त केली. ‘मी तो चित्रपट खूप आवडतो. त्याचा रिमेक आल्यास मला त्यातील मनीषा कोईरालाची भूमिका साकारायला आवडेल. त्या व्यक्तिरेखेच्या मी प्रेमातच पडले,’ असं ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/BbydNxOAFYO/

अनुष्काच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांच्या चित्रपटात ‘सरोगेट मदर’ची भूमिका साकारण्यासाठी तिला विचारण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे यानिमित्ताने एका अनोख्या भूमिकेत अनुष्काला चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.