News Flash

बिग बॉसच्या घरात रेखा यांनी महाभारतातील दुर्योधनाकडे केले होते दुर्लक्ष?

हा किस्सा बिग बॉस पर्व ८च्या वेळी घडला होता.

लॉकडाउनमुळे सध्या दूरदर्शन वाहिनीने ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. या मालिकांमध्ये ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. या मालिकांमधील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. विशेष म्हणजे महाभारतात दुर्योधन हे पात्र स्वीकारणारे पुनीत इस्सर सध्या चर्चेत आहेत. या चर्चा २०१४ मध्ये पुनीत हे बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते आणि त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. पण रेखा या पुनीत यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या सुरु झाल्या होत्या. तेव्हाचा हा किस्सा आता पुन्हा चर्चेत आहे.

पुनीत हे बिग बॉस पर्व ८मध्ये सहभागी झाले होते. हे पर्व सप्टेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या काळात गाजले होते. त्यावेळी रेखा त्यांचा चित्रपट ‘सुपर नानी’चे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसच्या घरात आल्या होत्या. पण त्यावेळी त्यांनी पुनीत यांना सोडून घरातील सर्व स्पर्धकांशी संवाद साधला.

८०च्या दशकात पुनीत आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. चित्रीकरणादरम्यान पुनीत यांनी जोरात मारल्याने अमिताभ यांच्या पोटाला जखम झाली होती आणि ही घटना आजही अनेकांच्या लक्षात आहे. ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेमुळे रेखा यांनी बिग बॉसच्या घरात येऊन पुनीत यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. त्यावेळी या सर्वांच्या विशेष चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा : सोनाक्षीला पाठिंबा देत महाभारतातील ‘दुर्योधना’चा मुकेश खन्नावर निशाणा

बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानने बिग बॉसच्या स्पर्धांकाना रेखा यांच्या विषयी काही बोलण्याची संधी दिली होती. त्यावर पुनीत यांनी, ‘रेखा मॅडम यांना पाहून मला काही गोष्टी आठवत आहेत’ असे म्हटले होते. त्यावर रेखा यांनी लगेच, ‘मला तुम्हाला पाहून खूप गोष्टी आठवतात’ असे म्हटले होते. आता महाभारत ही मालिका पुन्हा सुरु झाल्याने या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 11:49 am

Web Title: throwback to when rekha royally ignored mahabharats duryodhana aka puneet issar in bigg boss 8 avb 95
Next Stories
1 शाहरुखच्या ऑफिसचं विलगीकरण केंद्रात रुपांतर; पाहा व्हिडीओ
2 तेजस्विनी पंडित आज ‘२१ दुणे ४२’मध्ये लोकसत्ताच्या फेसबुकवर लाइव्ह
3 अजय देवगणने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाला…
Just Now!
X