News Flash

…म्हणून जॉन, सलमानला सोडून करिना गेली शाहीदकडे

आपल्या नातेसंबंधांबद्दल ते नेहमीच खुलेपणाने बोलायचे

आता जरी करिना कपूर आणि शाहीद कपूर आपआपल्या जोडीदारासोबत व्यक्तिगत आयुष्यात सुखी आहेत. असे असले तरी काही वर्षांपूर्वी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. दोघांनी एकत्र अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळेही केले आहेत. आपल्या नातेसंबंधांबद्दल ते नेहमीच खुलेपणाने बोलायचे आणि वागायचेही. अशाच एका पुरस्कार सोहळ्यात करिना अभिनेते जॉन अब्राहम आणि सलमान खानसोबत मुझसे शादी करोगी या गाण्यावर डान्स करत होती.

हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहताना जुन्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

बॉलिवूडमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासाचे एक पान सिनेरसिकांसमोर सादर करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ हा त्यांचा आगामी सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पद्मावतीचा पती, चित्तोडचा राजा रावल रतन सिंगची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. दीपिकाप्रमाणेच शाहिदलाही या भूमिकेसाठी चांगले मानधन मिळणार आहे अशी चर्चा सिनेवर्तुळात होत होती.

या ऐतिहासिक चित्रपटातील राजाची भूमिका साकरणारा शाहिद शारिरिक मेहनत घेताना दिसत आहे. वर्कआऊटसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे शाहिदने चक्क आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्येच कसरतीची सुविधा उपलब्ध केली आहे. अर्थातच चित्रपटासाठी शाहिदने सध्या चालत्या फिरत्या व्हॅनला जीमचे स्वरुप दिले आहे. अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील दमदार भूमिकेनंतर ‘पद्मावती’च्या पतीच्या भूमिकेसाठी शाहिद घाम गाळताना दिसत आहे. दीपिकाच्या नृत्य आविष्काराने या चित्रपटाच्या चित्रिकरणाला राजस्थानमधून सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, या चित्रपटाबाबतची गोपनियता ठेवण्याचे सर्व प्रयत्न करुन देखील रणवीरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणवीरची लाल रंगाची नजर दिसली होती. या पोस्टनंतर सिनेचाहते पद्मावतीच्या अधिकृत फर्स्ट लूकच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून या चित्रपटाकडून दिग्दर्शकासह मुख्य भूमिकेतील कलाकारांनाही अधिक अपेक्षा आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 7:33 pm

Web Title: throwback when kareen kapoor rejected salman khan and john abrahm for shahid kapoor
Next Stories
1 सिद्धार्थ मल्होत्राला या गोष्टीची वाटतेय सर्वाधिक भीती…
2 ‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकाला टक्कर देण्यास ऐश्वर्या सज्ज
3 ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने पोटगीसाठी मागितली ३० कोटी डॉलरची गडगंज रक्कम?
Just Now!
X