30 November 2020

News Flash

अखेर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’साठी प्रभू आला धावून

सिनेमाशी संबंधीत अनेक अपडेट कतरिना तिच्या चाहत्यांना देत असते

सध्या बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफ ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाशी संबंधीत अनेक अपडेट ती तिच्या चाहत्यांना देत असते. नुकताच तिने आमिर खान आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. प्रभुदेवाने या सिनेमातील एक गाणे कोरिओग्राफ केले आहे. प्रभुदेवाने गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले म्हटल्यावर ते गाणे फार खास असेल यात काही शंका नाही. आता प्रभुच्या स्टेप्सवर आमिर कसा थिरकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आमिर, अमिताभ बच्चन पहिल्यांदा सिनेमात एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दलची उत्सुकता फार आहे. सिनेमाची कथा नेमकी काय आहे याबद्दल अजूनपर्यंत माहिती मिळाली नसली तरी कतरिना, आमिर आणि अमिताभ या त्रिकुटांना एकत्र पाहण्यास सिनेरसिक उत्सुक आहेत.

सिनेमाबद्दल बोलताना आमिर म्हणाला की, ‘ज्या अभिनेत्याचे काम पाहत मी मोठा झालो त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. लहानपणापासूनच मी अमिताभ सरांना माझा गुरू मानायचो. या सिनेमात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी विक्टर आणि आदित्यचे आभार मानतो.’

अमिताभ यांनीही सिनेमाबद्दल त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘सध्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ची संपूर्ण टीम फार मेहनत घेत आहे. या सिनोमाची खास गोष्ट म्हणजे सिनेमाच्या कामात पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करताना दिसत आहेत. आमच्या काळापेक्षा हा काळ फार वेगळा आहे आणि ही फार सकारात्मक गोष्ट आहे. सिनेमाबद्दल सांगायला तसे फार काही आहे पण आम्हाला या सिनेमाबद्दल काहीही बोलण्यास मनाई केली आहे. ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 2:45 pm

Web Title: thugs of hindostan prabhudeva choreography aamir khan katrina kaif
Next Stories
1 आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सलमान खान, शिल्पा शेट्टीला समन्स
2 Bigg Boss 11: शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात रचला इतिहास
3 ‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ या दोन्ही चित्रपटांना फटका बसणार- ट्विंकल खन्ना
Just Now!
X