News Flash

मुंबईमध्ये स्नॉवेलचा ‘ती परत येईल?’ चा ऑडिओ- शो प्रीमियर

दुसऱ्या महायुद्धातल्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट अनपेक्षित वळणं घेत प्रत्येक मिनिटागणिक उत्कंठावर्धक बनते

ऑडिओ बुक्स आणि श्राव्य माध्यमात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्नॉवेल आता आपल्यापुढे ‘ती​ ​परत येईल?’ या रोमांचक गूढ गोष्टीसह एका नाविन्यपूर्ण पद्धतीने येत आहे! डॉ. गिरीश ओक यांच्या आवाजात, शिरीष देखणे यांची ही कथा अंजली कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केली ​​आहे.​ ध्वनी या माध्यमात विलक्षण ताकद आहे. आजकाल लोकांना नुसतं ध्वनी माध्यमातून खिळवून ठेवणं आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणं निश्चितच एक आव्हान आहे. स्नॉवेल सातत्याने या क्षेत्रात नवीन मैलाचे दगड उभे करत आले आहेत.

स्नॉवेलने, भारतात कदाचित सर्वप्रथम, थिएटरमध्ये ‘ऑडिओ- शो’ चा प्रीमियर योजून एका आगळ्या वेगळ्या ‘प्रयोगाचा’ पायंडाच पाडला आहे! पुण्यातील यशस्वी प्रतिसादानंतर मुंबईत हा प्रयोग होणार आहे. थिएटरसारख्या वातावरणात डोळे बंद करून साउंड इफेक्टसह गोष्ट अनुभवण्याची संधी रसिक श्रोत्यांना एक विलक्षण अनुभव देणारी असेल याची खात्री आहे. ​

ही कथा खास श्राव्य माध्यमासाठी लिहिली आहे. दुसऱ्या महायुद्धातल्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट अनपेक्षित वळणं घेत प्रत्येक मिनिटागणिक उत्कंठावर्धक बनते आणि आपल्याला खिळवून ठेवते. शनिवार २६ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह या ऑडिओ- शो प्रीमिअरचा आनंद लुटता येणार आहे. हा ऑडिओ- शो सर्वांसाठी खुला आहे. (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 7:40 pm

Web Title: ti parat yeil audio show premier
Next Stories
1 Big Boss Marathi: ही टीव्ही अभिनेत्री घेणार घरामध्ये दमदार एण्ट्री
2 ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेला नवे वळण!
3 Video: आजीला सोडताना भावूक झाली आराध्या
Just Now!
X