News Flash

दिशा पटानीच्या योग्यतेचा मी नाही – टायगर श्रॉफ

दिशा आणि टायगरची जोडी बॉलिवूडमधील चर्चित जोडप्यांपैकी एक आहे

दिशा पटानी, टायगर श्रॉफ

अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी आपलं नातं खुलेपणानं मान्य केलं नसलं तरी अनेक ठिकाणी ही जोडी एकत्र दिसते. त्यामुळेच एका चाहत्याने टायगरला तू दिशाला डेट करतोस का? असा प्रश्न विचारला. मात्र ‘मी दिशाच्या योग्यतेचा नाही’, असं म्हणत टायगरने या प्रश्नाचं उत्तर देणं चातुर्याने टाळलं आहे.

टायगरने शनिवारी इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी Q&A चं सेशन ठेवलं होतं. या सेशनअंतर्गंत चाहते टायगरला कोणताही प्रश्न विचारु शकत होते. टायगरही विचारलेल्या प्रश्नांची खुलेपणाने उत्तर देत होता. त्यातच एका चाहत्याने ‘तू दिशा पटानीला खरंच डेट करतोस का?’ असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नावर टायगरने मजेशीर अंदाजात पण तितकचं चातुर्याने उत्तर दिलं. ‘मी तिच्या योग्यतेचा नाही’, असं उत्तर टायगरने दिलं.

दरम्यान, ‘बेफिक्रे’ या म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र झळकलेली अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफची जोडी बॉलिवूडमधील चर्चित जोडप्यांपैकी एक आहे. या म्युझिक अल्बमनंतर या जोडीने ‘बागी २’ मध्ये देखील स्क्रिन शेअर केली होती. तेव्हापासून या जोडीच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 9:24 am

Web Title: tiger dating disha patani actor response will crack you up ssj 93
Next Stories
1 मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, अनुराग कश्यपने डिअॅक्टीवेट केलं ट्विटर अकाऊंट
2 रंगभूमी नाटककाराचीच!
3 तिकीटबारीवर ‘पाणी’
Just Now!
X