News Flash

‘बागी २’ ने मोडला ‘पद्मावत’चा हा रेकॉर्ड

'बागी २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ हा सिनेमा ३० मार्चला प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २५ कोटींहून जास्तीची कमाई केली आहे. टायगरच्या या सिनेमाने अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि रणवीर सिंगच्या पद्मावत सिनेमाला पहिल्या दिवसाच्या कमाईत केव्हाच मागे टाकले आहे. ‘बागी २’ ने शुक्रवारी भारतात २५.१० कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला आतापर्यंतचा पहिलाच सिनेमा ठरला आहे.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत म्हटले की, ‘बागी २’ सिनेमा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत तरी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. पद्मावत सिनेमालाही ‘बागी २’ ने मागे टाकले.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी’ या सिनेमाचा हा सिक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली. पण ‘बागी २’ मध्ये बॉलिवूडची बहुचर्चित दिशा- टायगरची जोडी पाहायला मिळत आहे. एकीकडे या दोघांची केमिस्ट्री, टायगरचा अॅक्शन अवतार, भरपूर साहसदृश्ये या सर्व गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारतात ३५००, तर परदेशात ६२५ अशा एकूण ४१२५ स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बागी २’ सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच ट्रेलर असो किंवा ‘एक दो तीन’ या माधुरीच्या गाण्याचा रिमेक, या सिनेमाला मौखिक प्रसिद्धीचाही चांगला फायदा होणार अशी शक्यता सिनेव्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात आली होती.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केलेले टॉप ५ सिनेमे
बागी २ – २५ कोटी
पद्मावत- १९ कोटी (एक दिवस अगोदर झालेल्या प्रीव्ह्यूसोबत २४ कोटी)
पॅडमॅन – १० कोटी
रेड – १०.०४ कोटी
सोनू के टीटू की स्वीटी- ६.४२ कोटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 2:12 pm

Web Title: tiger shroff disha patani baaghi 2 first day record break box office collection
Next Stories
1 सावधान : तैमूरचे फोटो वापरताय? कायदेशीर कारवाईची शक्यता
2 गूढ मालिकांचे ग्रहण
3 कात टाकतेय..
Just Now!
X