अॅक्शन सीनसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला केवळ लोकप्रियताच मिळत असून हा चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कलही वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये तान्हाजी : द अनसंग वॉरिअर या चित्रपटावरही मात केली आहे.

टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘बागी 3’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या टॉप ५ चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ‘बागी 3’ ने तान्हाजीला मागे टाकलं आहे.

‘बागी 3’ने पहिल्याच दिवशी १७.५० कोटींची कमाई केली आहे. तर तान्हाजी या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५. १० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे ‘बागी 3’ च्या कमाईमध्ये दुसऱ्या दिवशीही वाढ पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १५.५ ते १६ कोटींच्या आसपास कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

‘बागी 3’ हा चित्रपट २०२० मधील सर्वात जास्त ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५.१० कोटी, ‘लव्ह आज कल’ने १२.४० कोटी, ‘स्ट्रीट डान्सर 3D’ ने १०.२६ कोटी आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाने ९.५५ कोटी रूपयांची कमाई केली होती.

वाचा : ‘हिरोइन’ सिनेमात मी न्यूड सीन दिला, कारण…

दरम्यान, चीननंतर सध्या भारतावर करोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे लोक शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळतांना दिसून येत आहेत.मात्र असं असतानादेखील ‘बागी 3’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी चित्रपटगृहामध्ये गर्दी केली.