20 October 2020

News Flash

करिश्मासारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण?

जाणून घ्या तिच्या बद्दल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखी हुबेहुब दिसणारी एक मुलगी गाणे गाताना दिसत आहे. पण करिश्मासारखी दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

करिश्मासारख्या दिसणाऱ्या मुलीचे नाव हिना आहे. ती एक टिक-टॉक स्टार असून तिचे टिक-टॉकवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकताच तिने सोशल मीडियावर करिश्माच्या चित्रपटांमधील गाणे आणि डायलॉग बोलताना व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हिनाचे हे व्हिडीओपाहून अनेक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर ‘ओ.. कुद्रत का करिश्मा’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने तिचा हा व्हिडीओ करिश्माला टॅग करत ‘ही तर सेम तुझ्यासारखी दिसते… कार्बन कॉपी’ असे म्हटले आहे. तसेच एका चाहत्याने, ‘पाहून मला धक्काच बसला.. करिश्मा ही तर तुझी खरी बहिण वाटते’ असे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा सध्या लॉकडाउनमुळे तिचा संपूर्ण वेळ मुलांसोबत मुंबईमध्ये घालवताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने तिला आई बबीता कपूर, वडिल रणधीर कपूर आणि बहिण करिना कपूर खान यांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. ‘आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. पहिले आम्ही एकमेकांना दररोज भेटायचो. पण आता सध्याच्या कठिण काळात आम्हाला एकमेकांना भेटता नाही येत’ असे तिने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 5:21 pm

Web Title: tiktok sensation heena is karisma kapoors doppelganger avb 95
Next Stories
1 सोनू सूद म्हणतोय, “मला सर नका म्हणू त्याऐवजी ‘या’ नावाने हाक मारलेली आवडेल”
2 ‘हम आपके है कौन’च्या वेळी सलमानच्या त्या कृत्याने झाले होते आवाक, अभिनेत्रीने केला खुलासा
3 रणवीरच्या ‘या’ टोपीच्या किंमतीत तुमची संपूर्ण उन्हाळ्याची होईल शॉपिंग
Just Now!
X