अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. जगभरात चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली. ‘बाहुबली-द कॉन्क्लूजन’ आणि शाहरुख खानच्या ‘रईस’नंतर अक्षयच्या या चित्रपटाने जगभरात सर्वांत जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये तिसरा क्रमांकावर आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच अक्षय आणि भूमीचा एक फोटो डब्बूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय.

अक्षय आणि भूमीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सचं लक्ष वेधतोय. दोघांनी स्वत:भोवती टॉयलेट पेपर गुंडाळून टॉयलेट सीटजवळ उभे असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’मध्ये उघड्यावर शौचास बसण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर हा चित्रपट आधारित आहे.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

वाचा : ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सिझनमध्ये करण्यात आले ‘हे’ बदल

घरात शौचालय नसल्याने लग्नानंतर जया पतीला सोडून माहेरी जाते. त्यानंतर शौचालय बांधण्यासाठी तिच्या पतीचा संघर्ष सुरु होतो. घरात शौचालयासाठी केशव आणि जयाने दिलेल्या लढ्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलंय. अक्षय आणि भूमीशिवाय यामध्ये अनुपम खेर, दिव्येंदु शर्मा, सुधीर पांडे, शुभा खोटे यांच्याही भूमिका आहेत. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांची मनं जिंकतोय.