आजवर आपण ‘अॅव्हेंजर्स’, ‘अवतार’, ग्रॅव्हेटी’, ‘स्टार वॉर्स’, ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी’, ‘इंटरस्टेलर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पृथ्वीबाहेरील जग पाहिले आहे. परंतु ती दृश्य स्पेशल इफेक्ट आणि अॅनिमेशनच्या साहाय्याने तयार करण्यात आली होती. प्रेक्षकांना स्पेसचा अनुभव देण्यासाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु अभिनेता टॉम क्रुजचा आगामी चित्रपट यापुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. टॉम आता ‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजमध्ये थेट पृथ्वीबाहेर स्टंट करताना दिसणार आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड हवेत”; टायगर श्रॉफच्या कथित प्रेयसीचा व्हिडीओ व्हायरल

डेडलाईन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार टॉम क्रुस सध्या अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेत आहे. इलॉन मस्कची स्पेस एक्स कंपनी त्याला या ट्रेनिंगमध्ये मदत करत आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “करोनामुळे मंदिर बंद अन् दारुची दुकानं सुरु”; संतापला दाक्षिणात्य सुपरस्टार

मिशन इम्पॉसिबल ही टॉम क्रुजची सर्वाधिक गाजलेली चित्रपट सीरिज आहे. या चित्रपटांमध्ये टॉम अगदी जेम्स बॉण्डप्रमाणेच एका अमेरिकी गुप्तहेराची भूमिका साकारतो. या चित्रपटांमध्ये आजवर तो हॅलिकॉप्टर, विमान, रॉकेट्स, इमारतींवर स्टंट मारताना दिसला आहे. परंतु निर्माते आता आणखी पुढील पल्ला गाठण्याच्या तयारीत आहेत. टॉमला स्टंट करण्यासाठी थेट पृथ्वीबाहेर पाठवले जाणार आहे. जर हे दृश्य खरोखर चित्रीत करण्यात आलं तर पृथ्वीबाहेर जाऊन अभिनय करणारा तो इतिहासातील पहिला कलाकार ठरेल. सध्या तो नासामध्ये या दृश्याची कसून तयारी करत आहे. या गामाची चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित केलेले नाही. परंतु लवकरच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.