News Flash

टॉम क्रुझचे कोट्यवधींचे अलिशान घर विक्रीला

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने आपले अलिशान घर विकायला काढले आहे. या घराची किंमत तब्बल तीन कोटी ७० लाख पाऊंड इतकी आहे.

| November 17, 2014 01:49 am

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने आपले अलिशान घर विकायला काढले आहे. या घराची किंमत तब्बल तीन कोटी ७० लाख पाऊंड इतकी आहे. या घरात सात बेडरूम, नऊ बाथरूम, एक वाचनालय असून, हजारो एकरावर पसरलेल्या राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी या घरातून थेट मार्ग आहे. अमेरिकेत अनेक ठिकाणी मालमत्ता असलेल्या या ५२ वर्षीय अभिनेत्याने स्थानिक दगडाच्या माध्यमातून साकारलेले हे भव्य घर स्वत:साठी बनवून घेतले होते. २००६ मध्ये टॉम क्रुझ आणि त्याची पत्नी केट होल्मसने या अलिशान घरात माध्यमांसाठी त्यांची मुलगी ‘सुरी’च्या फोटोसेशनचे एका भव्य कार्यक्रमाद्वारे आयोजन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 1:49 am

Web Title: tom cruise puts ranch on sale at 37 million pounds
Next Stories
1 मी एक साधा माणूस! कोणालाही फसवत नाही, अथवा खोटं बोलत नाही – रणवीर सिंग
2 सर्जनशील विचारनिर्मितीचे व्यासपीठ
3 ‘ओमकारा’सारख्या चित्रपटांकडे परतायचं आहे
Just Now!
X