25 February 2021

News Flash

कुलकर्ण्यांच्या घरी दसऱ्याची लगबग; आसावरी देणार अभिजीत राजेंना खास गिफ्ट

आसावरीने तयार केलंय अभिजीत राजेंसाठी खास गिफ्ट

सध्या सगळीकडे नवरीत्रीचा उत्साह आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी आनंद आणि चैतन्यमय वातावरण आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाचा हा जल्लोष मालिकांच्या माध्यमांमधूनदेखील पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत अधिकमासाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता मालिकेतील कलाकारांना दसऱ्याचे वेध लागले आहे. म्हणूनच लवकरच या मालिकेत आता धुमधडाक्यात दसरा साजरा केला जाणार आहे.

सणावाराच्या दिवशी संपूर्ण कुटुंबातील लोक राग-लोभ विसरून एकत्र येतात. असंच काहीसं अग्गंबाई सासूबाई मालिकेत पाहायला मिळणार आहे. बबड्या म्हणजेच सोहम आणि अभिजीत राजे दसरा साजरा करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे दसऱ्याच्या निमित्ताने आसावरी अभिजीत राजेंना खास स्वत: शिवलेलं एक जॅकेट भेट म्हणून देणार आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या निमित्ताने अभिजीत आणि आसावरी यांच्या घरी पुन्हा आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. हा विशेष भाग २४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये अग्गंबाई सासूबाई या मालिकेचा आवर्जुन समावेश केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:26 pm

Web Title: tv show agabai sasubai dasara celebration asawari abhijit ssj 93
Next Stories
1 संजय दत्त कॅन्सरमुक्त; चाहत्यांचे मानले आभार
2 Photo : सोनाली बेंद्रेने शेअर केला फिटनेस फंडा
3 ‘माझ्या एलिमिनेशनसाठी सिद्धार्थ जबाबदार’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
Just Now!
X