News Flash

सलमानच्या अंगरक्षकाबाबत या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

शेवटच्या श्वासापर्यंत सलमानसोबत राहणार असल्याचे शेराने यापूर्वी म्हटले होते.

अंगरक्षक गुरमीत सिंग सोबत सलमान खान (संग्रहित फोटो)

बॉलिवू़डमध्ये सलमान खान हा नेहमीच या ना त्या कारणाने प्रकाशझोतात असतो. नुकतेच पाकिस्तानी कलाकारांना समर्थन दिल्याने तो चांगलाचा चर्चेत आला होता. आता सलमान खान आपल्या अंगरक्षकाने केलेल्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. २४ तास सलमानसोबत सावलीप्रमाणे सोबत असणारा शेरा याचे खरे नाव गुरमित सिंग असे आहे. सलमानचे कवच बनून रक्षण करणाऱ्या गुरुमीतवर एका व्यक्तिला गंभीर मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेरा मागील१८ वर्षापासून सलमानचा बॉडीगार्डर म्हणून कार्यरत आहे. तब्बल अठरा वर्षापासून सलमानसोबत सावलीप्रमाणे संरक्षण देणाऱ्या गुरपीतला सलमान आपल्या परिवारातील एक सदस्यच मानतो. सलमान कोणत्याही ठिकाणी जाणार असेल त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेरा त्या जागेची पाहणी करत असतो. यासाठी त्याने बऱ्याचदा चार ते पाच किलोमीटर पायी वारी देखील केली आहे. सलमान आणि त्याच्यातील संबंधावर बोलायचे तर सलमाने आपला बॉडीगार्ड हा लोकप्रिय चित्रपट शेराच्या नावाने समर्पित केला होता. एवढेच नाही तर या चित्रपटात शेरा सलमानसोबत नृत्य देखील करताना दिसला होता.

सलमानला सुरक्षा देणारा शेरा सुरुवातील शरीरसौष्ठव स्पर्धेची तयारी करत होता. त्याने अनेक स्पर्धा देखील गाजविल्या आहेत. त्याने ज्यूनिअर मिस्टर मुंबई आणि ज्यूनिअर मि. महाराष्ट्र किताब देखील पटकविले आहेत. सलमानच्या संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या शेराची स्वत:ची सुरक्षा पुरविणारी कंपनी देखील आहे. त्याने आपल्या कंपनीला आपल्या मुलाचे ‘टायगर ‘ हे नाव दिले आहे. शेराची ही कंपनी बॉलिवूडमधील कलाकारांना सुरक्षा पुरविण्याचे काम करते. शेवटच्या श्वासापर्यंत सलमानसोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या शेराने शरीरसौष्ठव स्पर्धा देखील गाजविल्या आहेत.

अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेरा, ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधानातील कलम ३२३, ३२६, ७२५/ १६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 9:36 pm

Web Title: unknown facts about salman khan bodyguard shera
Next Stories
1 इरफान खान होईल नवा रॉकस्टार
2 सोनाली कुलकर्णीची नवी इनिंग
3 या अभिनेत्रींनीही घेतली वेब मालिकेमध्ये एन्ट्री
Just Now!
X