इंग्रजांच्या गुलामीतून भारताची सुटका करताना कित्येक क्रांतिवीरांनी हौतात्म्य स्वीकारलं. यातलंच एक नाव म्हणजे क्रांतिवीर ‘शहीद भाई कोतवाल’. त्यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऋतुजा बागवे ही शहीद भाई कोतवाल यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून आता भाई कोतवाल यांच्या भूमिकेवरील पडदाही दूर सारण्यात आला आहे.

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रियता मिळविलेला अभिनेता आशुतोष पत्की या चित्रपटात झळकणार असून तो शहीद भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण ऊर्फ भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमधून आशुतोष भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांपेक्षा वेगळी वाट धरत त्याने अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटातून त्याला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं.