चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब हे सिनेमात दिसतं असतं. यासोबत समाजातही काय घडवता येईल, हे  दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न काही सिनेमांमधून केला जातो. असाच एक प्रयत्न निर्माते नितीन भोसले व दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी केला आहे. वेंकटेश्वरा फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या आगामी चित्रपटातून जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी मांडला आहे.
‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात एका छोट्या गावामधील ४ बहिणींची कथा चित्रित करण्यात आली आहे़. वडिलांच्या निधनानंतर चार बहिणी परिस्थितीचं गांभीर्य जाणून त्याला शरण न जाता त्याविरुद्ध कशा ठामपणे उभ्या राहतात याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात मांडला आहे. ऑस्करसहित अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महोत्सवांनी दखल घेतलेला हा सिनेमा १ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गेली ४६ वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागात काम करण्याचा वसा भोसले कुटुंबियांनी घेतला आहे. ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणून घेत त्यावर अभिनव कल्पनेने मात करण्याची जिद्द गावकऱ्यांना देणाऱ्या भोसले कुटुंबियांची तिसरी पिढी ही आता हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.
कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे समिधा गुरु,  भारत गणेशपुरे यांच्यासोबत गौरी कांगे, मोहिनी कुलकर्णी, व बालकलाकार नेत्रा माळी यांच्या भूमिका आहेत. कथा व संवाद प्रसाद नामजोशी यांचे आहे़त. इंद्रजीत भालेराव यांच्या गीतांन शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रविण वानखेडे आहेत़. छायांकन वसिम मणेर यांचे असून संकलन संतोष गोठोस्कर यांनी केले आहे.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!