News Flash

बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’चा समावेश

या चित्रपटानं २४४. ०६ कोटींची कमाई केली.

उरी

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’ चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या या चित्रपटाचा समावेश आता बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाची यादी प्रदर्शित केली. या यादीत गेल्या आठ वर्षांतील चित्रपटांचा समावेश आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत उरीनं दहावं स्थान मिळवलं आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. या चित्रपटानं २४४. ०६ कोटींची कमाई केली.

पुलवामा हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘बाहुबली २’ चित्रपटाचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘दंगल’ आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘संजू’चा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 6:50 pm

Web Title: uri becomes 10th highest grossing bollywood film ever
Next Stories
1 देसी गर्ल होणार सुपरगर्ल?, ‘माव्‍‌र्हल’ची प्रियांकाशी बोलणी सुरू
2 ‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती
3 Video: आलियाने वरुणला केले ‘एप्रिल फूल’
Just Now!
X