विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा नवीन वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली. आता प्रजासत्ताक दिनी या चित्रपटाची संपूर्ण टीम वाघा-अटारी सीमेला भेट देणार आहे. सीमेवरील जवानांसोबत चित्रपटाची टीम प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

वाघा बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनी शानदार सोहळा रंगतो. ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा पाहण्यासाठी देशातील अनेक लोक गर्दी करतात. सीमेवर जवानांसोबत विकी कौशल, यामी गौतम आणि ‘उरी’ची संपूर्ण टीम हा दिवस साजरा करणार आहे.

जाणून घ्या, सेलिब्रिटींना कसा वाटला ‘ठाकरे’?

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर ‘उरी’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यांत बॉक्स ऑफीसवर १०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे.