09 March 2021

News Flash

महेश कोठारेंच्या सुनेनं केला मेकओव्हर; बघून अभिनेत्रीही झाल्या अवाक्

फोटोवर आदिनाथ कोठारेने दिली अशी प्रतिक्रिया

उर्मिला कोठारे

अभिनय आणि नृत्यात पारंगच असलेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री व महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारेनं मेकओव्हर केला आहे. मेकओव्हर नंतर केलेल्या फोटोशूटमधला एक फोटो तिने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उर्मिलाला ओळखणंही कठीण होत आहे. उर्मिलाचा हा मेकओव्हर नेटकऱ्यांसोबतच अभिनेत्रींनाही खूप आवडला आहे.

‘स्त्रीकडे असलेली सर्वात मोहक संपत्ती म्हणजे आत्मविश्वास’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या कॅप्शनप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिची भेदक नजर नेटकऱ्यांना भुरळ पाडत आहे. या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. क्रांती रेडकर, गिरीजा ओक, फुलवा खामकर यांनी कमेंट्समध्ये उर्मिलाची प्रशंसा केली आहे.

आणखी वाचा : दुसऱ्या संधीसाठी कायम कृतज्ञ राहीन- मनिषा कोइराला

उर्मिलाच्या फोटोवर आदिनाथनेही ‘उफ्फ्फ..’ अशी कमेंट केली आहे. उर्मिला सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असून तिच्या कुटुंबावर ती लक्ष केंद्रीत आहे. मुलगी जिजासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 5:44 pm

Web Title: urmila kothare new mesmerizing look ssv 92
Next Stories
1 “मला घरी जाऊन मार खावा लागेल”; सुधा मूर्तींच्या उत्तरावर बिग बींची प्रतिक्रिया
2 दुसऱ्या संधीसाठी कायम कृतज्ञ राहीन- मनिषा कोइराला
3 Video : “बाळाकडे लक्ष देता येत नाहीये,” अटकेच्या वृत्तानंतर सारा श्रवण भावूक
Just Now!
X