बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. कधी ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे. नुकताच उर्वशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
उर्वशी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. या जॅकेटची किंमत जवळपास ५ लाख रुपये आहे.
View this post on Instagram
उर्वशी रौतेला लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ती सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सीरिजमध्ये उर्वशी अभिनेता रणदीप हूड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. “इंस्पेक्टर अविनाश” ही सीरिज नीरज पाठक दिग्दर्शित करीत आहे. या सीरिजमध्ये पोलीस अधिकारी अविनाश मिश्राची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच उर्वशी इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात काम करणार आहे. दरम्यान उर्वशी “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 7:26 pm