बॉलिवूडमध्ये चित्रपट आणि कलाकारांच्या अभिनयासोबतच अफेअर, ब्रेकअप-पॅचअप या चर्चा कायमच रंगत असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक कलाकार त्यांच्या अफेअरच्या चर्चेत राहिले आहेत. यामधलाच एक अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. पत्नी सुझान खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक त्याच्या अफेअरमुळे बऱ्याच वेळा चर्चेत राहिला. अभिनेत्री कंगना रणौत, उर्वशी रौतेला या अभिनेत्रींसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र, या अफवांवर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मौन सोडलं असून तिने संताप व्यक्त केला आहे.

“सोशल मीडियावर अनेकदा चुकीच्या गोष्टी लवकर व्हायरल होतात. या सगळ्याचा मला खरंच फार मानसिक त्रास झाला. मी रात्री २ ते पहाटे ४ पर्यंत हृतिकशी फोनवर बोलत होते वगैरे असे अनेक खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले. या काळात मी एक गोष्ट पाहिली असे आरोप कधीच स्टारकिड्सवर होत नाहीत. एक कालाकार म्हणून मला हृतिक आणि त्याचा अभिनय आवडतो. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की माझं त्याच्यावर प्रेम आहे. या सगळ्या अफवांमुळे मला फार मानसिक त्रास सहन करावा लागला. कदाचित सुशांतसोबतही असंच काहीसं झालं असेल”, असं उर्वशी म्हणाली.

दरम्यान, उर्वशी रौतेला हे कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. अलिकडेच ती एका कॉमेडी-ड्रामा चित्रपटात झळकली होती. उर्वशी लवकरच ब्लॅक रोज या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.