News Flash

उर्वशी रौतेला लॉकडाउनमध्ये खेळतेय क्रिकेट; व्हिडीओ होतोय व्हायरल

उर्वशीची आक्रमक फलंदाजी पाहून तुम्ही देखील व्हाल चकित

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क क्रिकेटमुळे चर्चेत आहे. उर्वशी लॉकडाउनच्या काळात चक्क क्रिकेटचा आनंद घेताना दिसतेय. तिचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

View this post on Instagram

 

#queen @urvashirautela Playing #cricket #urvashirautela #urvashirautelahot #urvashians

A post shared by Rudra UrvashiRautela (@urvashirautela4ever_) on

उर्वशीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ती उजव्या व डाव्या दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी करत आहे. मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीची ही आक्रमक फलंदाजी पाहून तिचे चाहते देखील चकित झाले आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी उर्वशी अभिनेता गौतम गुलाटीमुळे चर्चेत होती. गौतमसोबत लग्न करतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून, खरंच उर्वशीने लग्न केलं का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. सर्वप्रथम गौतम गुलाटीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला होता. “तुम्ही आम्हाला शुभेच्छा देणार नाही का?” अशी कॉमेंटही या फोटोवर लिहिली होती. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला. परंतु खरं म्हणजे गौतमने उर्वशीसोबत लग्न केलेलं नाही. ‘वर्जिन भानुप्रिया’ नावाच्या एका वेब सीरिजमधील हा फोटो होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:58 pm

Web Title: urvashi rautela playing cricket video viral mppg 94
Next Stories
1 ‘अमिताभ रुग्णालयात, आता तू तुझं पोट कसं भरणार?’, ट्रोलरला अभिषेकने दिले सणसणीत प्रत्युत्तर
2 ‘या’ दिग्दर्शकांचे काम आवडते- अक्षय इंडीकर
3 ‘मलाही अशी औषधे देण्यात आली होती ज्यामुळे मी…’,सिमी गरेवालचा सुशांतच्या चाहत्याला रिप्लाय
Just Now!
X