बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेला वरुण धवन-नताशा दलाल यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला आहे. काल (२४ जानेवारी) अलिबागमध्ये या दोघांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. करोना पार्श्वभूमीवर या लग्नसोहळ्याला केवळ ५० जणांचा आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटी आणि दिग्गजांसाठी लवकरच एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
करोना काळ असल्यामुळे वरुण आणि नताशा यांना अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. मात्र, लवकरच ते अन्य सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लग्नानंतर वरुण आणि नताशाचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल
View this post on Instagram
२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वरुण-नताशाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केलं जाणार आहे.
वाचा : ‘ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते’; कंगनाने शेअर केली ‘ती’ आठवण
दरम्यान, वरुण आणि नताशा यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे २२ जानेवारीपासून या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. अखेर २४ जानेवारी रोजी या दोघांनी अलिबागमधील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे लग्न केलं. या लग्न सोहळ्यात दिग्दर्शक करण जोहर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, दिग्दर्शक कुणाल कोहली असे अनेक दिग्गज सहभागी झाले होते.