बॉलिवूड कलाकरांना आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफर त्यांना फॉलो करत असतात. पण अशाच एका फोटो ग्राफरची तक्रार अभिनेता वरुण धवनने पोलिसांकडे केली आहे. सध्या वरुण धवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका फोटोग्राफरची तक्रार पोलिसांकडे करत असल्याचे दिसत आहे.

वरुण धवन त्याच्या गाडीमधून उतरत असतो. त्याला फॉलो करत एक फोटोग्राफर तेथे पोहोचतो. वरुण त्याला ओरडण्यासाठी तेथे उभे असलेल्या पोलिसांना बोलवतो. ‘सर या फोटोग्राफरला समजवा… मला फॉलो करता करता हा पडला तर त्याला लागेल’ असे वरुण म्हणतो. त्यानंतर तो पुढे म्हणतो, ‘तुम्ही याला घेऊन जा. एक दिवस तरुंगात राहिल आणि ठिक होऊन येईल. आता भीती वाटते ना…?’ असे वरुण म्हणाला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. यापूर्वी देखील वरुणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये वरुणने याच फोटोग्राफरला मिठी मारुन फोटो काढले होते.