News Flash

नीतू कपूर, वरुण धवन करोना पॉझिटिव्ह? ‘जुग जुग जियो’चं चित्रीकरण अर्ध्यावर

अनिल कपूर यांचीदेखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती?

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटींनादेखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता नीतू कपूर, वरुण धवन आणि दिग्दर्शक राज मेहता यांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ‘फिल्मफेअर’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.

सध्या राज मेहता यांच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि नीतू कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. मात्र, चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच या दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत राज मेहता यांचेदेखील रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

दरम्यान, राज, नीतू आणि वरुण यांच्यासोबतच अनिल कपूर यांचीदेखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, नंतर योग्य तपासणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:30 pm

Web Title: varun dhawan neetu kapoor director raj mehta tests covid19 positive during jug jug jeeyo shooting ssj 93
Next Stories
1 “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक
2 ‘लिज्जत पापड’ची यशोगाथा रुपेरी पडद्यावर; आशुतोष गोवारीकरांच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची वर्णी
3 “तुम्हाला जळवण्यासाठी ही पोस्ट करतोय”; अभिनेत्यानं उडवली कंगनाची खिल्ली
Just Now!
X