बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. यावेळी वरुण ‘कुली नंबर १’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर त्याने शेअर केले आहे. या पोस्टरवर देखील करोनाचा इफेक्ट पाहायला मिळत आहे.
#coolieno1 pic.twitter.com/o8R5T6Tio8
— Varun Dhawan (@Varun_dvn) June 11, 2020
वरुण धवनने ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचे नवं पोस्टर ट्विट केलं आहे. या पोस्टरमध्ये वरुणच्या तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. या अनोख्या पोस्टरमुळे ‘कुली नंबर १’चं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचा फटका इतर व्यवसायांसोबतच चित्रपट उद्योगालाही बसला आहे. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबलं आहे. या यादीत वरुण धवनचा ‘कुली नंबर १’ हा चित्रपट देखील आहे. वर्षाच्या सुरुवातीस या चित्रपटाचं चित्रीकरण संपणार होतं. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आलं.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आता देशभरातील लॉकडाउन हळूहळू उठवला जात आहे. निर्मात्यांना चित्रीकरणाची संमती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे पोस्टर पाहून वरुण देखील चित्रीकरणासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. नव्या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री सारा अली खान देखील झळकणार आहे.