News Flash

पाहा : ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटातील ‘आता माझी सटकली’ गाणे

'सिंघम' चित्रपटात 'आता माझी सटकली' हा संवाद लोकप्रीय झाला होता त्यावरच आता प्रसिध्द रॅप गायक हनी सिंगने रॅप गाणे तयार केले असून, ते 'सिंघम रिटर्न्स'मध्ये

| August 1, 2014 11:25 am

‘सिंघम’ चित्रपटात ‘आता माझी सटकली’ हा संवाद लोकप्रीय झाला होता त्यावरच आता प्रसिध्द रॅप गायक हनी सिंगने रॅप गाणे तयार केले असून, ते ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यात अभिनेता अजय देवगण पोलीस अधिकाऱ्याच्या ‘सिंघम’ अवतारात असून त्याच्यासोबत शेकडो लहान मुले पोलीसाच्या वेशभुषेत ठेका धरताना दिसतात. मराठमोळ्या अवतारातील करिना कपूरदेखील खचितच सुंदर दिसते. ‘मला राग येतोय’ म्हणणारा लहानगा तर निव्वळ अप्रतिम! गोपाळकाल्याच्या तोंडावर प्रसिध्द झालेले हे गाणे नक्कीच सगळ्यांना ठेका धरायला लावणारे असे आहे. याआधी सदर गाण्याबाबत प्रतिक्रिया देताना करिना म्हणाली होती, मी हनी सिंगच्या गाण्यांची चाहती आहे. त्यामुळे मी या गाण्यासाठी भरपूर उत्साही असून, माझी भूमिका असलेल्या चित्रपटाला हनी सिंगने पहिल्यांदाच गाणे दिले आहे. ज्याप्रकारे गाण्याचे उत्कृष्ट चित्रिकरण करण्यात आले आहे, त्यावरून हे गाणे बॉलीवूडमध्ये नक्की धुमाकूळ घालेल, तसेच गाण्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वासदेखील तिने व्यक्त केला.

पाहा आता माझी सटकली गाण्याचा व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2014 11:25 am

Web Title: video aata majhi satakli from singham returns
Next Stories
1 चित्रनगरीः त्रिकुटाची धमाल ‘पोश्टर बॉईज’
2 पाकिस्तानमध्ये सुट्टीच्या दिवसांत सलमानच्या ‘किक’ची सर्वाधिक कमाई
3 राजेश खन्ना यांच्या निकटवर्तिय अनिता अडवानी यांनी मानले न्यायव्यवस्थेचे आभार
Just Now!
X