21 September 2020

News Flash

विद्या बालनचे आगळे रूप!

नेहमीच्या पठडीपेक्षा काही तरी वेगळे करण्यासाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन प्रसिद्ध आहे.

| June 13, 2015 02:43 am

नेहमीच्या पठडीपेक्षा काही तरी वेगळे करण्यासाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन प्रसिद्ध आहे. एखाद्या कलाकारासाठीही ते एक आव्हान असते. विद्या बालनने एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी केलेल्या फोटोसेशनमुळे तिचे वेगळे रूप चाहत्यांसमोर आले आहे. या वेगळ्या रूपासाठी विद्या बालन हिने चेहऱ्यावर मिशी लावली असून ही एक आदरांजली असल्याचे तिचे म्हणणे आहे.
विद्या बालन ज्यांना आपले आदर्श मानते त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून विद्याने या मासिकासाठी हे खास फोटोसेशन केले आहे.
फोटोसेशनचे खास वैशिष्टय़ म्हणजे गुरुदत्त, राज कपूर, किशोरकुमार आणि चार्ली चॅप्लिन यांच्या पेहेरावात विद्या बालनने हे फोटोसेशन केले आहे.
ही सर्व मंडळी आपले आदर्श असून गुरुदत्त यांचे चित्रपट समाजातील वास्तवाचे भान आपल्याला देतात आणि जगण्याबद्दल विचार करायला लावतात. तर राज कपूर यांनी बॉलीवूडच्या मोठय़ा पडद्यावर सर्वसामान्य माणूस खूप मोठय़ा ताकदीने उभा केला. त्यांचे सर्व चित्रपट आजच्या परिस्थितीलाही लागू पडतात. या सर्व दिग्गज मंडळींना आदरांजली म्हणून आपण हे फोटोसेशन केले असल्याचे विद्याचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:43 am

Web Title: vidya balan in different look
टॅग Vidya Balan
Next Stories
1 धर्मेंद्र-हेमा मालिनी झाले आजी-आजोबा
2 मनवा-भूषणची जोडी जमली रे!
3 संदीप पाटलांचा ‘चिराग’ मराठी टेलिव्हिजनच्या पडद्यावर
Just Now!
X