News Flash

विद्युत जामवालचा नंदिता महतानीसोबत साखरपुडा? हातात अंगठी असलेला फोटो केला शेअर

विद्यूत जामवाल नुकतंच त्याची कथित गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत ताजमहाल पाहण्यासाठी गेला होता. यावेळचा दोघांचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

Vidyut-Jammwal-engaged-to-Nandita-Mahtani
(Photo: APH Images)

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल लाखो हृदयांवर राज्य करतो. प्रत्येक वेळी तो आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकतो. सोशल मीडियावर लाखो लोक विद्युतला फॉलो करतात. त्याची महिला फॅन फॉलोइंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पण आता त्याच्यावर फिदा होणाऱ्या मुलींचं मन तुटणार असं चित्र दिसतंय. इलेक्ट्रिकल डिझायनर आणि कथित गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत विद्यूत जामवाल नुकतंच ताजमहाल पाहण्यासाठी गेले होते. यावेळचा दोघांचा एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. त्यांच्या या फोटोवरून दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांना सध्या वेग आलाय.

विद्युत आणि त्याची कथित गर्लफ्रेंड नंदिता हे दोघे ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे गेले होते. विद्युत पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याने पांढरा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट परिधान केली होती. लांब केस, दाढी आणि शेड्स मध्ये त्याला ओळखणं खूप कठीण बनलंय. दुसरीकडे, नंदिताने पांढरा टॉप असलेला फ्लोरल स्कर्ट परिधान केलाय.

ताजमहालच्या समोर काढलेला दोघांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. यात विद्युतने नंदिताचा हात पकडलेला आहे आणि नंदिताच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसत आहे. या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर दोघांनी साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, यावर अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आणखी वाचा : सिद्धार्थ आणि शेहनाजचा झाला होता साखरपुडा; येत्या डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

आणखी वाचा: उर्वशी रौतेलाचा टफ वर्कआउट पाहून चाहत्यांना फुटला घाम !

विद्युत नंदिताला डेट करतोय

नंदिता आणि विद्युत यांच्या रिलेशनशीपच्या बातम्या खूप दिवसांपासून येत आहेत. जरी दोघांनीही त्यांच्या नात्यावर खात्री दिलेली नाही. पण तरीही ताजमहालमध्ये दोघांना एकत्र पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतंय की दोघेही एकत्र रिलेशनशीपमध्ये आहेत.

नंदिता एक फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक शोसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. नंदिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काही वेळापूर्वी तिने विद्युतसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. नंदिताचे पहिले लग्न संजय कपूरसोबत झाले होते. नंदितापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजयने करिश्मा कपूरशी लग्न केले. आता तो तिच्यापासून सुद्धा घटस्फोटित आहे.

विद्युतबद्दल बोलायचं झालं तर, आजकाल तो त्याच्या ‘खुदा हाफिज’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच येत आहे. तशी घोषणाही त्याने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 8:20 pm

Web Title: vidyut jammwal and nandita mahtani went to tajmahal photo highlighting the diamond ring viral on social media prp 93
Next Stories
1 ‘अजून एकदा म्हटलस तर…’, फोटोग्राफरनं ‘त्या’ नावानं हाक मारताच यामी गौतमचा चढला पारा
2 उर्वशी रौतेलाचा टफ वर्कआउट पाहून चाहत्यांना फुटला घाम !
3 ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल
Just Now!
X