News Flash

‘विजयने अचानक तिचा हात ओढला आणि…’, काय घडलं त्या दिवशी क्रू मेंबरने केला खुलासा

विजय राजला लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राजला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. चित्रीकरणाच्या वेळी एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता सेटवरील एका क्रू मेंबरने त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं हे मिड-डेशी संवाद साधताना सांगितले आहे.

सेटवर उपस्थित असलेल्या क्रू मेंबरने त्यादिवशी चित्रीकरणादरम्यान नेमकं काय झाले होते हे सांगितले आहे. ‘चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री बसली होती. तिचे विजयकडे लक्ष नव्हते. त्याने अचानक त्या अभिनेत्रीचा हात ओढला आणि कामाच्या ठिकाणी स्त्रीयांना अशी वागणूक मिळत असल्यामुळे ती प्रचंड चिडली. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रयत्न केला’ असे त्या क्रू मेंबरने म्हटले.

पुढे तो क्रू मेंबर म्हणाला, ‘विजयला त्याची चुकी लक्षात आली त्याने तातडीने अभिनेत्रीची माफी मांगितली.’ त्यानंतर त्या दिवसाचे चित्रीकरण थांबवण्यात आले.

विजय राज आपला आगामी चित्रपट घेऊन लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव शेरनी असं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरमान हा प्रकार घडला. अभिनेत्रीसोबत गैरवर्तणुक केल्याचा आरोपानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होते. नंतर विजयला जामीन मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 4:57 pm

Web Title: vijay raaz yanked her arm and she lost her temper said by crew member avb 95
Next Stories
1 Video : रितेश-जेनेलियाचं दिवाळी गिफ्ट, ‘आशेची रोषणाई’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र
2 ‘प्रियकर असेल तर श्रीमंतच हवा’; रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचं वक्तव्य
3 इब्राहिम कलाविश्वात येणार? सैफ म्हणतो…
Just Now!
X