News Flash

PHOTOS : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवरील आमिरचा लूक लीक

आमिरचे लीक झालेले फोटो पाहता सर्वांनी त्याच्या लूकविषयी लावलेला तर्क चुकीचा ठरला.

मि.परफेक्शनिस्ट आमिर खान, ठग्स ऑफ हिंदोस्तान

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटासाठी चित्रीकरण करतोय. कोणत्याही व्यक्तिरेखेशी समरस होऊन भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमिरने या चित्रपटातील पात्रासाठी वजन कमी केलंय. दरम्यान, अनेकांना तो याच चित्रपटासाठी दाढी वाढवत असल्याचे वाटत होते. मात्र आता त्याचे लीक झालेले फोटो पाहता सर्वांनी त्याच्या लूकविषयी लावलेला तर्क चुकीचा ठरला. या फोटोंमध्ये हा अभिनेता मळकट कपड्यांमधील लूकमध्ये ओळखणेही कठीण आहे.

वाचा : Revealed ‘टायगर जिंदा है’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘सुई धागा’, ‘संदीप और पिंकी फरार’ या दिवशी होणार प्रदर्शित

लांब केस आणि मिश्यांमधील आमिर खूप बारीक पण तरीही फिट दिसतोय. विजय कृष्ण आचार्य यांच्या चित्रपटासाठी आमिरने समुद्री डाकूसारखा लूक धारण केल्याचे फोटोंवरून कळते. आमिरच्या काही चाहत्यांनी त्याचे सेटवरील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्याच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता आता आणखी द्विगुणीत झाली आहे.

वाचा : .. म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी त्याला मानते अशुभ

शुक्रवारीच यशराज फिल्म्सने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘वायआरएफ’ बॅनरने सर्वात मोठा चित्रपट वर्षअखेरसाठी राखून ठेवला असून चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते असलेला हा‘अॅक्शन अॅडव्हेंचर’पट ७ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होईल असे ट्विट केले. यात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत.

याआधी आमिरने कान आणि नाक टोचलेले फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून त्याच्या लूकचा अंदाज लावला जात होता. आपल्या लूकविषयी आमिर म्हणालेला की, ”ठग्स ऑफ.. ‘मध्ये मी मस्क्युलर लूकमध्ये दिसणार नाही. यात माझी सडपातळ शरीरयष्टी पाहावयास मिळेल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 5:14 pm

Web Title: viral photo aamir khan dons a rugged and a shabby look for thugs of hindostan
Next Stories
1 .. म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी त्याला मानते अशुभ
2 कंगनासोबतचा वाद विसरून आदित्य पांचोलीने पाहिला ‘सिमरन’!
3 शिल्पा शेट्टीच्या स्कार्फची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Just Now!
X