News Flash

क्रीडा सन्मान पुरस्कार सोहळ्यात विराट- अनुष्काचीच जादू

रेड कार्पेटवर विरुष्का

विराट कोहली, अनुष्का शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी जिथेही जाते तिथे सर्वांचे लक्ष वेधते. फोटोग्राफर्स या दोघांचे एकत्र फोटो काढण्यास उत्सुक असतात. या दोघांचे नाते आता प्रसारमाध्यमांपासून लपून राहिले नाही. किंबहुना विराटनेही अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले. नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा सन्मान पुरस्कार सोहळ्यात विराट- अनुष्काचीच जादू पाहायला मिळाली. विरुष्काने रेड कार्पेटवर एकत्र झळकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र, तरीही या जोडीने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमे आणि फोटोग्राफर्सचे लक्ष वेधले.

यावेळी विराट निळ्या रंगाच्या सूटमध्ये तर अनुष्का लाल रंगाच्या सूटमध्ये अत्यंत सुंदर दिसत होते. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन विराट कोहली फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. रेड कार्पेटवर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत झळकला. मात्र, सर्वांत जास्त चर्चा झाली ती विरुष्काचीच. या कार्यक्रमानंतर विराटच्या इन्स्टाग्राम डिसप्ले पिक्चरवरही अनुष्कासोबतचा फोटो पाहायला मिळाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 11:54 am

Web Title: virat kohli and anushka sharma fire up indian sports honours red carpet
Next Stories
1 बोलाची कढी, बोलाचेच ‘वाद’
2 ‘शास्त्रीय संगीताची ‘पुरणपोळी’ तरुणांना नक्की आवडेल’
3 नेपथ्यातील बाबा
Just Now!
X