22 October 2019

News Flash

विराट कोहली, दीपिका पदुकोण सर्वांत महागडे सेलिब्रिटी

सर्वांत महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट सलग दुसऱ्यांदा अग्रस्थानी

विराट कोहली, दीपिका पदुकोण

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. २०१८ या वर्षातील सर्वांत महागडा भारतीय सेलिब्रिटी विराट कोहली ठरला आहे. त्यापाठोपाठ बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पदुकोण आहे.

‘डफ अँड फेल्प्स’द्वारा जाहीर करण्यात आलेल्या भारतातील सर्वांत महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट सलग दुसऱ्यांदा अग्रस्थानी आहे. विराटचे ब्रँड मूल्य १७०.९ मिलिनय डॉलर तर दीपिकाचे ब्रँड मूल्य १०२.५ मिलिनय डॉलर इतके आहे. विशेष म्हणजे विराटशिवाय १०० मिलियन डॉलर ब्रँड मूल्याचा आकडा पार करणारी एकमेव सेलिब्रिटी दीपिका ठरली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत विराटने भारतातील २४ विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या तर दीपिकाने २१ विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या. भारतात जाहिरातींसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना अधिक महत्त्व दिलं जातं. पण विराट याला अपवाद ठरला आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत प्रसिद्धीच्या बाबतीत विराट अव्वल ठरला आहे.

विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दीपिकाचा पती रणवीर सिंग चौथ्या स्थानी आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि हृतिक रोशन यांचा टॉप १०मध्ये समावेश आहे.

 

First Published on January 11, 2019 1:01 pm

Web Title: virat kohli and deepika padukone top the list of most valuable indian celebs