इंडिया vs इंग्लंड 3rd ODI : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये उद्या (१७ जुलै) तिसरा एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यासाठी सज्ज झाली असून कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर या सामन्यासाठी रवाना झाला आहे. सध्या याच प्रवासातील त्यांचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यांच्याबरोबर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के.एल राहुलदेखील असल्याचं पाहायला मिळतंय.
विराट-अनुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून सध्या हे जोडपं एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आगामी सामना पाहण्यासाठी अनुष्कादेखील विराटबरोबर लंडनला पोहोचली आहे. यावेळी लंडन ते लिड्स या रेल्वे प्रवासातील त्यांचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोमध्ये विराट, अनुष्का, हार्दिक आणि राहुल फुलऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसून येत आहे.
या रेल्वे प्रवासातील एका फोटोमध्ये विरुष्काने सेल्फी काढला असून या फोटोत त्याच्यामागे राहुल आणि हार्दिक दिसून येत आहे. हा फोटो के.एल.राहुलने शेअर केला असून ‘मस्तमौला मित्रांबरोबरचा मजेशीर प्रवास’ असं कॅप्शन राहुलने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, अनुष्काची अनेक क्रिकेटपटूंबरोबर चांगली मैत्री असून तिने आतापर्यंत क्रिकेटपटूंच्या अनेक पार्टी, सोहळ्यांना हजेरी लावल्याचं पाहायला मिळतं.