करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळे देशवासीयांचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मजुरांच्या मदतीसाठी अभिनेत्री वाणी कपूर पुढे सरसावली आहे. तिने मजुरांच्या मदतीसाठी एक नामी शक्कल लढवली आहे. तिच्यासोबत डेटवर जा आणि मजुरांची मदत करा असा एक अनोखा प्रयोग तिने सुरु केला आहे.
‘बेफिक्रे’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली वाणी कपूर आपल्या चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती करोना विषाणूमुळे चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या चाहत्यांना तिच्यासोबत व्हर्च्युल डेटवर येण्याचं आवाहन केलं आहे.
मजुरांच्या मदतीसाठी वाणीने एक अनोखा प्रकल्प सुरु केला आहे. जर तुम्हाला मजुरांची मदत करायची असेल तर या https://www.fankind.org/index.php?/Vaani लिंकवर जाऊन पैसे डोनेट करा. पैसे देणाऱ्यापैकी कुठल्याही पाच लकी चाहत्यांना वाणीसोबत व्हर्च्युल डेटवर जाण्याची संधी मिळेल. या लिंकवरुन जमा करण्यात येणारे पैसे मजुरांच्या मदतीसाठी वापरण्यात येतील असं वाणीने इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती तुम्ही या लिंकवर क्लिक करुन मिळवू शकता.
यापूर्वी असाच काहीसा प्रयोग हॉलिवूड अभिनेत्री एमेलिया क्लार्क हिने केला होता. परंतु ५० पौंड देण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिच्यासोबत डेटवर जाण्याची संधी मिळत होती. अशा प्रकारच्या व्हर्च्युल डेटिंगमधून एमेलियाने लाखो रुपये गोळा केले होते. हे पैसे तिने जागतिक आरोग्य संघटनेला दान केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 4:00 pm