अवघा देश करोनामुळे २१ दिवस लॉकडाउन झाला आहे. महाराष्ट्रात तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा लोकांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये नऊ कुटुंबांची काळजी घेण्याचे आवाहन केले. मोदींच्या या आवाहानला साद देत एका बॉलिवूड अभिनेत्यानं लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.

हा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. त्याने ट्विटरद्वारे लॉकडाउनच्या काळात नऊ कुटुंबांची मदत करत असल्याचे सांगितले आहे. ‘ऐकमेकांना सहकार्य करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये नऊ कुटुंबांना मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला साद दिली आहे. तुम्ही देखील तुमच्या परिने मदत करा’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशने देखील मदत केली होती. त्याने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी N95 व FFP3 मास्कचा वाटत केला. तसेच दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी त्यांच्या राहत्य घराचे रुपांतर करोनाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये करा असे म्हटले. ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुन याने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यातील करोनाग्रस्तांसाठी १.२५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या घराचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करा’, अभिनेत्याने केला मदतीचा हात पुढे

भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.