वाजिद यांच्या संगीताने सदाबहार झालेली बॉलिवूडमधील गाणीवाजिद यांच्या संगीताने सदाबहार झालेली बॉलिवूडमधील गाणीबाॉलिवूडमधील लोकप्रिय गाण्यांना आपल्या संगीताने नवा साज चढविणाऱ्या साजिद वाजिद या जोडीमधील वाजिद खान यांचं सोमवारी (१ जून) निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षीय या दिग्गज संगीतकाराचं निधन झाल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वाजिद यांनी अनेक गाण्यांना त्यांचं संगीत देऊन सदाबहार केलं होतं. त्यांची अनेक गाणी आज लोकप्रिय झाली आहेत. अशीच काही वाजिद यांची काही गाजलेली गाणी.

१. तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है –

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

सलमान खान आणि वाजिद यांच्या मैत्रीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. सलमानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटातील ‘तेरी जवानी बडी मस्त मस्त है’, या गाण्याला साजिद-वाजिद यांनी संगीत दिलं होतं. हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं.

२. चुपके से कोई आयेगा –

अरबाज खान, सलमान खान आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हॅलो ब्रदर’ या चित्रपटातील ‘चुपके से कोई आयेगा’ या गाण्याला वाजिद यांनी संगीत दिलं होतं. हे गाणं अभिनेत्री राणी मुखर्जीवर चित्रीत करण्यात आलं होतं. तसंच ‘हटा सावन की घटा’, ‘हॅलो ब्रदर’ या गाण्यांनाही त्यांचंच संगीत लाभलं होतं.

३. लाल दुपट्टा-

‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील जवळपास सात गाण्यांना साजिद-वाजिद यांचं संगीत लाभलं आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं लोकप्रिय झालं होतं. मात्र ‘लाल दुपट्टा’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठी दिसून येतं.

४. मेरा ही जलवा –

‘वॉण्टेड’ या चित्रपटातील मेरा ही जलवा हे गाणं सलमान खानवर चित्रीत करण्यात आलं असून साजिद-वाजिद या जोडीने याला संगीत दिलं आहे.

५. तुझे आक्सा बीच घुमा दूं –

‘गॉड तुसी ग्रेट हो’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

६. सोनी दे नखरे –

‘पार्टनर’ चित्रपटातील या गाण्याला वाजिद यांनी संगीत दिलं होतं.

७. हमका पीनी हैं-

‘दबंग’ चित्रपटातील लोकप्रिय ठरलेलं गाणं म्हणजे ‘हमका पीनी है’. या गाण्यात सलमान खान झळकला आहे.

८. पांडे जी सीटी –

‘दबंग’ सीरिजमधील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं.त्यातलंच एक गाणं म्हणजे ‘पांडे जी सीटी’. ‘दबंग २’मधील हे गाणं आहे.

 

दरम्यान, साजिद-वाजिद या जोडीने कलाविश्वातील अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘दबंग 3’, ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’, ‘पागलपंती’, ‘सत्यमेव जयते’, ‘जुड़वा 2’, ‘फ्रीकी अली’, ‘क्या कूल हैं हम 3’, ‘सिंह इज ब्लिंग’, ‘डॉली की डोली’, ‘तेवर’, ‘दावत ए इश्क’, ‘बुलेट राजा’, ‘मैं तेरा हिरो’, ‘हिरोपंती’, ‘दबंग 2’, ‘सन ऑफ सरदार’, ‘कमाल धमाल मालामाल’, ‘एक था टायगर’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘राउडी राठोड’, ‘हाउसफुल 2’, ‘नो प्रॉब्लम’, ‘दबंग’, ‘वीर’, ‘वॉण्डेट’, ‘वेलकम’, ‘पार्टनर’, ‘तेरे नाम’, ‘हम तुम्हारे हैं सनम’, ‘हॅलो ब्रदर’, ‘प्यार किया तो डरना क्या’, या चित्रपटांना संगीत दिलं आहे.